डुप्लिकेट सोने दाखवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे बनावट बिस्कीट विक्रीचा बहाणा करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू व चोरी करणारे सराईत तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बनावट सोन्याचे बिस्कीट असा ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनात पोउपनि प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात तीन व्यक्ती सोन्याचे डुप्लीकेट बिस्कीट विक्रीसाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले असल्याची माहिती मिळताच पथकाने खात्री करून घटनास्थळी छापा टाकून बाबाराव सूर्यकांत जाधव (वय ३०), केशव छगन जाधव (वय ५०), संदीप दगडू जाधव (वय २९) तिघे रा. सलगरा ता. लातूर) यांची  झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच सोनेरी रंगाचे डुप्लीकेट बिस्कीट मिळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी महिलांना ‘सोन्याचे बिस्कीट’ देण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले. तसेच बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरी केल्याचेही निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव व एमआयडीसी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एकूण १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम, २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत  ३ लाख ३० हजार रुपये तसेच बनावट सोन्याचे बिस्कीट असा ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर व चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10

Latest news