इंटरनेटवर पक्ष चालवणे आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे

मुंबई : प्रतिनिधी
सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून पक्ष चालवणे आणि प्रत्यक्ष राजकारण करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत, राजकीय पक्षांनी या नव्या डिजिटल ट्रेंडला घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर येथे आयोजित शब्दगंध साहित्य संमेलनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना मंत्री भरणे यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते.

राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करणे, लोकांमध्ये राहून संघर्ष करणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवणे यात मोठा फरक असतो. अनेक कष्टातून राजकीय पक्ष उभे राहतात. त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’मुळे प्रस्थापित पक्षांना धोका निर्माण होईल, असे वाटत नाही, असे भरणे म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटले की, आजचा तरुण काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असतो. सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतच हे स्पष्ट होईल की या डिजिटल लाटेमागे खरोखरच जनाधार आहे की फक्त सोशल मीडिया ट्रेंड. डिझेल तुटवड्याच्या अफवा
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात डिझेल तुटवडा असल्याच्या चर्चांवरही मंत्री भरणे यांनी भाष्य केले. ‘राज्यात डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. सातबारा दाखवल्यावरच डिझेल मिळणार, अशा चर्चा पूर्णपणे अफवा आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतक-यांना आवाहन
अफवांमुळे राज्यात डिझेल खरेदीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगत त्यांनी शेतक-यांना गैरसमज करून रांगा लावू नयेत, असे आवाहन केले. ‘जर कोणी डिझेलसाठी सातबारा मागत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news