भीमाशंकर आराखड्यावरून राजकारण तापले

पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर विकास आराखड्याला ‘खेड-आंबेगाव’ असे संयुक्त नाव देण्याच्या चर्चेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. यावर लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भीमाशंकर विकास आराखड्याच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून खेड आणि आंबेगाव तालुक्यात लोकप्रतिनिधीमध्ये वाद रंगला आहे. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
खेड येथे आमदार बाबाजी काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

वळसे पाटील यांनी समोर येत ‘खेड-आंबेगावमध्ये कोणताही संघर्ष नाही. काही जण मुद्दाम राजकीय वातावरण तापवून जनतेची दिशाभूल करत आहेत,’असा आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच भीमाशंकर विकास आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीत विकास आराखड्याच्या नावासंदर्भात चर्चा झाली. स्थानिक भावना लक्षात घेऊन आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली होती.

वळसे पाटील म्हणाले, हा केवळ नावाचा प्रश्न नाही, तर वस्तुस्थिती समजून घेण्याचा विषय आहे. भीमाशंकर मंदिर भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्यात येते, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. मात्र मंदिर परिसरातील अनेक सुविधा, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि सामाजिक संबंध आंबेगाव तालुक्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे विकास आराखड्याला संयुक्त नाव देण्याचा विचार पुढे आला. यात कुठेही तालुक्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा हेतू नाही.

काहींना फक्त विरोध करायची सवय
राजकीय टोलेबाजी करताना वळसे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘‘काही लोकांना स्वत: काही काम करायचे नसते. दुस-यांनी केलेल्या प्रत्येक कामात अडथळे आणणे आणि चुकीच्या गोष्टी पसरवणे, हीच त्यांची पद्धत झाली आहे. अशा प्रवृत्तीकडे मी फारसे लक्ष देत नाही,’ असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news