30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रताम्हिणी घाटात शाळेची बस उलटली; २ ठार, ५५ जखमी

ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटली; २ ठार, ५५ जखमी

रायगड : रायगडमध्ये एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत असून, पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, ५५ जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हिणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे.

अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. दरम्यान, कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, ५५ जखमी आहेत.

क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला
पुणे-माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात खाजगी बसला झालेल्या अपघातात २ महिला प्रवासी ठार झाल्या, तर ५५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून हरिहरेश्वर येथे पर्यटकांना घेऊन येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR