बंगळुरू : भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन ‘गगनयान’मधील चार अंतराळवीरांची नावे समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही अंतराळवीरांना एस्ट्रोनॉट व्ािंग्स घातले. हे चौघेही इंडियन एअर फोर्सचे टेस्ट पायलट्स आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी त्या चौघांची नाव आहेत. हे चौघेही अनुभवी वैज्ञानिक आहेत. या चौघांनी प्रत्येक प्रकारच फायटर जेट उडवले आहे.
प्रत्येक फायटर जेटची कमतरता आणि वैशिष्ट्य त्यांना माहिती आहे. म्हणूनच या चौघांना गगनयान एस्ट्रोनॉट ट्रेनिंगसाठी निवडण्यात आले. सध्या बंगळुरुत एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात चौघांचे प्रशिक्षण सुरु आहे.
गगनयान मिशनसाठी शेकडो वैमानिकांची चाचणी झाली. त्यानंतर एकूण १२ वैमानिकांची निवड झाली. हे १२ पहिल्या लेव्हलवर आले. त्यांचे सिलेक्शन इंस्टीट्यूट ऑफ एयरोस्पेस मेडिसिनमध्ये झाले. त्यानंतर अनेक राऊंडची सिलेक्शन प्रोसेस झाली. त्यानंतर इस्त्रो आणि भारतीय वायुसेनेने या चौघांची नावे निश्चित केली आहेत. या चौघांना इस्रोने २०२० च्या सुरुवातीला रशियाला पाठवले होते. तिथे त्यांना बेसिक एस्ट्रोनॉट ट्रेनिंग मिळाले. कोविड-१९ मुळे त्यांच्या प्रशिक्षणाला विलंब झाला. २०२१ ला प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर या चौघांचे सतत प्रशिक्षण सुरु आहे.
इस्रोच्या ूमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिमुलेटर्स बसवण्यात येत आहेत. तिथे चौघांचा सराव सुरु आहे. हे चौघेही मिशन गगनयानसाठी जाणार नाहीत. यापैकी २ ते ३ मिशन गगनयानसाठी निवडले जातील.