औसा : प्रतिनिधी
भारतीयष संस्कृतीत साजरा करण्यात येणा-या सणात गुढी पाडव्यास मोठे महत्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणापासून मराठी नवीन वर्षाची सुरवात मानली जाते. शेतकरी याच सणादिवशी नवीन सालगडी व शेतीची अनेक कामे करतात तसेच मोठ्या प्रमाणात आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात. शुभ मुहूर्ताच्या सौद्यात सोयाबीन, तूर, हरभरा या शेतीमालाचे पूजन बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे व उपसभापती भीमाशंकर राचट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक धनराज जाधव, सुरेश औटी, बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे, अब्दुलहाक शेख भुजंग सोमवंशी सौदा प्रमुख सोमनाथ जाधव, खरेदीदार अनिल गाजरे, गणेश बिदादा, गोंिवद दळवे ,राहुल साळुंखे व्यंकट निर्मले, विजय कुरले सत्यवान साळुंखे, उत्तरेश्वर पावले, सचिन मलवाडे, बाबा यादव, आडते काकासाहेब दळवे, सुभाष पवार सतीश माडजे, वीरभद्र माशाळे, गणेश राचट्टे, आकाश देवकते तसेच कीर्ती उद्योग ,कीर्ती दाल मिल, विजयसोया, धनराज सॉल्वीक्स ,चंद्रकांत ट्रेडिंग कंपनी , मथुरा पल्सेस यांचे प्रतिनिधी व शेतकरी व हमाल, मुनीम हे उपस्थित होते. ८२०० क्वींटल आवक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर औसा बाजार समितीमध्ये ८२०० किं्वटल शेतीमालाची आवक झाली असून याप्रसंगी सोयाबीन ला ४७२५ रुपये हरभरा विजय ६३०० रुपये तूर ११३०० रुपये प्रतिक्विटल दर मिळाला आहे. शेतक-यांमध्ये याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे याप्रसंगी सभापती व उपसभापती यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.