26.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूर२५ हजार वडांची झाडे लावून वट पौर्णिमा साजरी

२५ हजार वडांची झाडे लावून वट पौर्णिमा साजरी

लातूर : प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यात वृक्ष आच्छादनाचेप्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने यावर्षी माझ लातुर- हरीत लातुर या संकल्पनेअंतर्गत १.४० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुषंगान ेविविध दिनांचे ऑचित्­य साधुन वृक्ष लागवड ग्रामपंचायतीमध्­ये मोठया प्रमाणात केली जात आहे. त्­याचाच एक भाग म्­हणून वट-पौर्णिमा दिवशी गावातील प्रत्येक महिलांनी किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे. तसेच याच दिवशी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत किमान १०० वडाची झाडे लाऊन त्याची जोपासना करावी असे आवाहन जिल्­हाधिकारी व मुख्­य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. या उपक्रमामध्­ये गावातील नागरिक, कर्मचारी, बचतगट, तरुण मंडळ, स्वयंसेवी संस्था व महिलांनीही आपले योगदान देत ग्रामिण भागातील महिलांनी वट पौर्णिमेनिमित्­त २५ हजार पेक्षा जास्­त वट वृक्षाची लागवड करुन उदंड प्रतिसाद दिला.
वटपौर्णिमेनिमित्­त जिल्­हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व मुख्­य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्­या
संकल्­पनेतून महिलांनी प्रत्­येक गावात कमीतकमी १० ते १०० वट वृक्ष महिलांच्­या हाताने लावून संपुर्ण जिल्­हयात वटपौर्णिमा महिलांनी उत्­साहात साजरी केली. यावेळी स्­वत: जिल्­हाधिकारी व मुख्­य कार्यकारी अधिकारी यांचेसमवेत जिपच्­या विविध विभागाचे विभाग प्रमुख यांनी त्­यांना नेमून दिलेल्­या कार्यक्षेत्रात भेटी देवून वृक्ष लागवड विशेष अभियान अंतर्गत वड, आंबा, पिंपळ, लिंब, जांभुळ, चिंच व करंज यासारकख्­या झाडांची शाळा, अंगणवाडी, दवाखाने, गावातील शासकिय ईमारतीचा परीसर, स्­मशानभुमी, दहन व दफनभुमी, गावांतर्गत रस्­ते या ठिकाणी १ लाख २३५ पेक्षा जास्­त आज रोजी वृक्ष लागवड करण्­यात आली.
यावेळी जिल्­हाधिकारी व मुख्­य कार्यकारी अधिकारी यांनी अहमदपूर तालुक्­यातील देवकरा,परचंडा,काजळहिप्­परगा वकिनगाव या ठिकाणी प्रत्­यक्ष भेटी देवून वृक्ष लागवड अभियानांतर्गत ग्रामपंचायत शाळा व शासकिय ईमारतीच्­या ठिकाणी त्­यांचे हस्­ते प्रातिनिधीक स्­वरुपात वृक्ष लागवड करण्­यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR