लातूर : प्रतिनिधी
आपल्या आईच्या स्मृती जपण्यासाठी रक्षा नदीत विसर्जन न करता अनेक वृक्ष लावून त्या वृक्षांना विसर्जीत केली. झाडे लावून तिथे अस्थी विसर्जन करुन येथील निलंगेकर कुटूंबियांनी पर्यावरण व निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. आपल्या आईच्या स्मृती या वृक्ष रुपात जतन करणारे असे हे निलंगेकर कुटुंबीय सह्याद्री देवराई, द लातूर संस्कृतीचे सदस्य दीपरत्न निलंगेकर यांच्या आईचे तीन दिवसांपूवी निधन झाले. अस्थी, रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व रक्षा एकत्र करुन अनेक लोक पारंपारिक पद्धतीने नदीत विसर्जन करतात पण ही रक्षा आपल्या शेतामध्ये नेऊन अनेक झाडे लावून ती रक्षा झाडांना विसर्जीत करण्यात आली. शेतामध्ये वडीलांचे स्मृतीस्थळ आहे तिथेच स्मृतीस्थळाजवळ अनेक वृक्ष लावून त्या झाडांना ही रक्षा विसर्जन करुन अनेक झाडे लावली.
शेतामध्ये सर्व कुटुंबियांनी श्रमदान करुन खड्डे पाडले, कोणी घागरीने पाणी आणले आणि ही सगळी वृक्ष लावली आधीच या शेतामध्ये इथे मेडशिंगी, कवट बेल, कडुलिंब, हिवर, पळस, सिंधी, अशी अनेक दुर्मिळ झाडे आहेत. या परिसरात आईच्या स्मृती जपण्यासाठी तुळशीची, नारळाची, वडाची झाडे लावण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे निलंगेकर कुटुंबाचे सामाजिक स्तरांमधून कौतुक होत आहे.