17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयदिल्लीच्या कोचिंग सेंटर घटनेतील मालक-समन्वयक पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीच्या कोचिंग सेंटर घटनेतील मालक-समन्वयक पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या अपघातानंतर, कोचिंग सेंटरचे मालक आणि समन्वयक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या दोघांची चौकशी करत आहेत. दोघांना अटक करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने एक मुलगा आणि दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन अशी त्यांची नावे आहेत. तिघांच्याही कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेवरून भाजप-आपमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर तिन जनाचा मृत्यू झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यां रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये एक मुलगी यूपीमधील आंबेडकर नगरची असून विद्यार्थिनी केरळची आहे, तर दुसरी विद्यार्थिनी तेलंगणातील आहे. पोलिसांनी बीएनएस कलम १०५, १०६(१), १५२, २९० आणि ३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये बचावकार्य जवळपास पूर्ण झाले असून, थोडेच पाणी शिल्लक आहे. तळघरासह इमारत पूर्णपणे रिकामी आहे. तिथे कोणीही अडकलेले नाही. या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या महापौरांनी इमारत उपनियमांचे उल्लंघन करणा-या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अपघाताला दिल्ली सरकार जबाबदार : भाजप

अपघातासाठी दिल्ली सरकारला जबाबदार धरत आहे. नाल्यांची साफसफाई होत नसल्याने आणि नाल्यातील पाणी कोचिंग सेंटरच्या तळघरात वेगाने शिरल्याने हा अपघात झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या अपघाताला दिल्ली सरकारचा गुन्हेगारी निष्काळजीपणा जबाबदार आहे. जल बोर्ड मंत्री अतिशी आणि स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असे भाजपने म्हटले आहे.

या घटनेबाबत आप नेत्यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय म्हणाल्या की, या घटनेची माहिती मिळताच आमदार दुर्गेश पाठक आणि मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आहेत. अचानक नाला किंवा गटार फुटले आणि तळघर पाण्याणे तुडुंब भरले अशी माहिती मिळाली आहे. तपास आणि बचावकार्य सुरू आहे. काही वेळात सर्व काही स्पष्ट होईल. एमसीडी किंवा इतर कोणतेही विभाग जबाबदार असतील त्यांना सोडले जाणार नाही. आरोप करण्याची ही वेळ नाही. राजकारणाच्या वरती उठून काम करायला हवी, असे महापौर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR