23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रदिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा

नाशिक : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली.या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागावाटपाआधीच नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा करत पहिला उमेदवार निश्चित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक दौ-यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची मोठी घोषणा केली आहे.

सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ हे अख्या राज्याचे, सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ते केवळ आदिवासीचे नेते नाहीत. इथे सर्वांना गोकुळ झिरवळ यांच्याबाबत उत्सुकता आहेच. झिरवळ काय करणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. झिरवाळ साहेब एकच करणार, जी टोपी तटकरेंच्या डोक्यावर घातली, त्या टोपीसह अजितदादांनी सोबत राहणार आहे. इथले उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढतील. मी मुद्दाम नाव घेतले नव्हतं, पण तुम्ही विचारणार म्हणून सांगतो, त्यांचे नाव आहे नरहरी झिरवाळ, असे म्हणत सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR