18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रहावडावरून मुंबईला जाणा-या ट्रेनचे १८ डबे घसरले, २ ठार; अनेक गाड्या रद्द

हावडावरून मुंबईला जाणा-या ट्रेनचे १८ डबे घसरले, २ ठार; अनेक गाड्या रद्द

रांची : झारखंडमधील सरायकेला-खरसावन जिल्ह्यात आज पहाटे मुंबई-हावडा मेल क्रमांक १२८१० या ट्रेनचे १८ डबे रुळावरून घसरले. या घटनेत दोन जणांचा झाला मृत्यू तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर रेल्वे विभागाचे पीआरओ म्हणाले की, सोमवारी रात्री हावडाहून निघालेल्या या ट्रेनचा आज पहाटे अपघात झाला. या ट्रेनमधील प्रवाशांना पाठवण्यासाठी दुस-या ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, जमशेदपूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर असलेल्या बारांबोजवळ पहाटे ३.४५ वाजता हा अपघात झाला. हे ठिकाण पश्चिम सिंगभूमपासून अगदी जवळ आहे. मुंबई-हावडा मेलचे २२ पैकी १८ डबे बारांबोजवळ रुळावरून घसरले आहेत. जखमींना प्राथमिक वैद्यकीय मदत देण्यात आली असून, आता चक्रधरपूर येथे चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

६ आठवड्यांत ३ अपघात; १७ ठार, १०० हून अधिक जखमी
दरम्यान, गेल्या वर्षीच्या ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर सुरक्षेबाबत चिंता कायम आहे. या अपघातात सुमारे २९० जणांचा मृत्यू झाला. मात्र, ओडिशा रेल्वे अपघातानंतरही अनेक रेल्वे अपघात पाहायला मिळाले. आज झारखंडमधील बारांबो येथे हावडा-मुंबई मेलच्या १८ बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जखमी झाले. मागील सहा आठवड्यांत तीन प्रवासी रेल्वे अपघात झाले असून, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, यामुळे रेल्वे प्रवासावर चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR