नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर इंडिया आघाडीची रॅली सुरू आहे. त्यात आम आदमी पार्टी, काँग्रेस, सपा, टीएमसी (तृणमूल काँग्रेस) सह इतर पक्षांचे नेते दाखल झाले आहेत. तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचे कारण देत ही रॅली काढण्यात येत आहे.
या रॅली दरम्यान, सपा नेते अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यास सीबीआय, ईडी, आयटीसारख्या खोटे खटले दाखल करणा-या संस्था संपवण्याची घोषणा अखिलेश यांनी केली.
केजरीवाल यांच्यावर केवळ राजकीय स्वार्थासाठी अन्याय होत आहे. सर्वांत मोठी शक्ती जनतेकडे आहे, ज्यांनी ४०० पेक्षा जास्त दावा केला त्यांना बहुमत मिळाले नाही. केजरीवाल यांच्या सुटकेसाठी त्यांची पत्नी लढत आहे. राजकारणात विचारधारा वेगळी असलेल्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असे यापूर्वी कधी झाले नाही, असे अखिलेश म्हणाले.