रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाशी युती करायची याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
चंपाई सोरेन यांनी म्हटले की माझ्यासमोर तीन पर्याय आहेत. यामध्ये निवृत्ती, संघटना किंवा मैत्री यांचा समावेश आहे. मी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, तसेच जर मला चांगला मित्र मिळाला तर मी त्या मित्रासोबत पुढे जाईन पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या पक्षाबाबत ही भूमिका मांडली तसेच भविष्यातील युतीबाबतही संकेत दिले.