18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रबदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संताप

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संताप

भरपावसात महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
बदलापुरातील बालअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट आहे. मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसतेय. मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. अशातच घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे.

हातात झेंडा घेऊन तसेच तोंडाला काळी पट्टी बांधून उद्धव ठाकरे निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. रश्मी ठाकरेंसह आदित्य ठाकरे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. महिला अत्याचाराच्या मुद्याला घेऊन आज शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत अनेक महिला- पुरुष आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शिवाय सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासंदर्भात वेळ मिळाला नाही, म्हणून अन्यथा उग्र आंदोलन यापुढे करू असा, इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.

पुण्यात भरपावसात शरद पवार आंदोलनात सहभागी झाले होते. तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांची आहे. यासोबतच आंदोलकांच्या वतीने राज्य सरकारने शक्ती कायदा लागू केला असता तर बदलापूरसारखी घटना घडली नसती. परंतु, केवळ शक्ती कायद्याचं श्रेय महाविकास आघाडीच्या सरकारला मिळेल, म्हणून केंद्र सरकार शक्ती कायदा लागू करत नाही, अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात भाजप आक्रमक
महाविकास आघाडीच्या विरोधात पुण्यात भाजपकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूरमधील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा कुटील डाव उच्च न्यायालयाच्या आदेशाने हाणून पाडला. तरीही आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या प्रकरणाचे राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत पुणे शहर भाजपच्या वतीने महविकास आघाडीच्या विरोधात काळ्या फिती लावून मूक निषेध आंदोलन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR