23.9 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeलातूर‘जागृती’च्या सभासदांना दस-यानिमित्त साखर वाटप

‘जागृती’च्या सभासदांना दस-यानिमित्त साखर वाटप

लातूर : प्रतिनिधी
राज्यात खाजगी साखर उद्योग क्षेत्रात उस उत्पादक शेतक-यांंना एफआरपीपेक्षा अधिक भाव देणारा व मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी दस-यानिमित्त सभासदांना साखर वाटप तसेच कर्मचा-यांना १६.६६ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सभासदांना साखर कमी दरात वाटप करण्यात येणार असून कर्मचा-यांना दिवाळीचे (बोनस) सानुग्रह अनुदान म्हणून १६.६६ टक्के देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दस-यांच्या पूर्व संध्येला सभासदांना गोड बातमी मिळाली आहे. याबाबत जागृती शुगरच्या अध्यक्षा सौ गौरवीताई अतुल भोसले देशमुख यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाने बैठकीत हा निर्णय जाहीर केला असून त्यामुळे कारखान्याचा सभासदांनी १५ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबरपर्यंत आपापल्या गट कार्यालयात प्रती किलो २५ रूपये प्रमाणे सभासदास १५ किलो साखर अल्प दरात देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्डसोबत ओळख म्हणून घेऊन यावे, असे आवाहन जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR