डिंडीगुल : वृत्तसंस्था
तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होळपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीचे दृश्य भयावह होते. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिची रोडवरील सिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
ज्यावेळी रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर उपचार सुरू असणा-या रुग्णांना तातडीनं दुस-या रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं.