मुंबई : प्रतिनिधी
भाजपच्या आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतू एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते आहेत, असे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान, २०२२ बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतू आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या. त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलेआहे.
बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानंतर मतमोजणी दिवशी विरोधक देश सोडून पळून जातील, असे संजय राऊत आज सकाळी बोलताना म्हणाले. त्यावर शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली आहे. बॅलन्स पेपरवर घ्या. ईव्हीएम मशीनवर निवडणुका घ्या. अजून कुठलेही संशोधन करा. परंतु संजय राऊत तुमचे काल घर भुई सपाट झालेला आहे. त्यातील पत्र विटा काही चांगले असतील तर गोळा करा आणि तुमचं झोपडं बांधा. या संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले. आता उरली सुरली ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळे केल्याशिवाय तो काय आता गप्प बसत नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिले आहे.