26.1 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeलातूरपाठीशी घालणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत

पाठीशी घालणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत

रेणापूर : प्रतिनिधी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन व त्यांना पाठीशी घालणा-या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत  अशा मागणीचे निवेदन रेणापूर तालुका सरपंच संघटनेचे वतीने तहसीलदार यांना शुक्रवारी (दि .१३) देण्यात आले .
मस्साजोग (ता. केज जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांचा निघृणपणे खुन करण्यात आला याचे पडसाद राज्यात उमटले आहेत.   अपहरणाची माहिती मिळूनदेखील पोलिस प्रशासनाने योग्य ती तात्काळ कार्यवाही न केल्यामुळे गावातील प्रथम नागरीक सरपंच यांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व गावगाडा चालविणा-या सरपंचामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने सरपंचाचे अपहरण झाले असता तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही करणे आवश्यक होते परंतु पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करीत नाहीत ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारी असून खंडणी, अपहरण, खुन, सर्व सामान्यांची लुट, दडपशाही आणि गुंडगिरी यास पोलिस प्रशासनाचा आश्रय असल्यामुळेच कायद्याचे धिंडवडे उडले आहेत. अशा परिस्थीतीत सर्वसामान्य जनता जिव मुठीत घेऊन जगत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत तसेच त्यांच्य खुनामागे कट रचणारे गावगुंड यांच्या विरूध्द पोलिस कार्यवाही करीत नाहीत तसेच सरपंचाचे अपहरणानंतर गुन्हा दाखल करण्यास व त्यांचा शोध घेण्यास पोलिस अधिकारी यांनी टाळाटाळ केली. सर्वप्रकार कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असा आरोप निवेदनात करून गुन्हेगारा सोबतच  पोलिस प्रशासनतील दोषी अधिका-यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे .  सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना तसेच या खुनाच्या कटामागे असलेल्या व्यक्तीना तात्काळ अटक करण्यात यावी व या घटनेची चौकशी सी.आय.डी. मार्फत करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी कसून चौकशी करावी तसेच सदरचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यिात यावे व तपासकामात दिरंगाई करणा-या पोलिस अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशा अशा विविध मागण्यांचे निवेदन रेणापूर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.९)तहसीलदार यांना देण्यात आले.
याबाबत कारवाई न झाल्यास सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजय गंभीरे, कार्याध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, अ‍ॅड . रमेश खाडप, पांडुरंग कलुरे ,ओम चव्हाण, संगीता काळे, आश्रुबा चोरमले, तानाजी चव्हाण, अंगद जाधव, किशन सिरसागर,दिनेश पाटील,रमेश कटके, व्यंकट पवार, विठ्ठल साखरे, स्वप्निल पाटील, गजानन बोळंगे  यांच्यासह पदाधिकारी व सरपंचयांच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR