19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeलातूर७० वर्षीय महिलेचा खून करून मृतदेहासोबत चार दिवस बलात्कार

७० वर्षीय महिलेचा खून करून मृतदेहासोबत चार दिवस बलात्कार

लातूरमध्ये घृणास्पद प्रकार

लातूर : मागच्या काही दिवसांपासून देशभरात बलात्कार आणि खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चिमुकल्या मुली हैवानांच्या शिकार होत आहेत. आता वयस्कर महिलाही सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला हादरवून टाकणारी एक घटना लातूरमध्ये घडली आहे.

लातूरमधल्या एका गावात ७० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्याचा आला. एवढेच नाही तर ३१ वर्षीय आरोपीने तब्बल चार दिवस मृत महिलेवर बलात्कार केल्याचे कळत आहे. भादा, औसा आणि लातूर या तीन ठाण्याची पथक संबंधित गावामध्ये तपास करत आहेत. घटनेतील ३१ वर्षीय आरोपीचे नाव मन्सूर सादिक होगाडे असे आहे. मन्सूर हा शेतमजूर आहे. त्याच्या विचित्र स्वभावामुळे त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. त्याची आईदेखील त्याच्या वागण्याला वैतागलेली होती असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी मन्सूरची आई गावी गेली होती. त्याचा मन्सूरने फायदा उचलला.

गावातून एक ७० वर्षीय महिला गायब होती. मन्सूरने त्या महिलेचे अपहरण केले, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. एवढेच नाही तर मृत महिलेच्या प्रेतावर मन्सूर चार दिवस बलात्कार करत होता अशी माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्सूरला अटक केली. आरोपी मन्सूर हा ३१ वर्षांचा आहे. घटनेनंतर जेव्हा आई गावावरुन माघारी आली तेव्हा तिला घरात दुर्गंधी येत असल्याचे दिसले.

घरात मृतदेह असल्याचे लक्षात आल्यानंतर आईनेच गावामध्ये याची माहिती दिली. घटनास्थळी भादा, औसा आणि लातूर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पीएम रिपोर्टनंतरच या घटनेतील सत्यता बाहेर येणार आहे. या घटनेमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. पाशवी मनोवृत्तीच्या मन्सूरची पोलिस चौकशी करत असून या प्रकरणी आणखी बारकावे पुढे येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR