17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeपरभणीऐन निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाला दणका; जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांचा राजीनामा, आज वंचित मध्ये...

ऐन निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाला दणका; जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांचा राजीनामा, आज वंचित मध्ये प्रवेश

सेलू : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर यांनी खासदार संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे उमेदवार विजय भांबळे यांच्या जातीय राजकारणाला कंटाळूनऐन निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा दिला असून सोमवारी ते वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करणार आहेत.

सेलू तालुक्यातील वालूर येथील सरपंच व एक बडे प्रस्थ असलेले संजय साडेगावकर यांनी ऊबाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा तडका फडकी राजीनामा देऊन शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दणका दिला असून शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे.

गेल्या काही दिवसापासून संजय साडेगावकर हे शिवसेनेत उबाठा गट विचलित होते. साडेगावकर यांच्याकडे पाथरी व जिंतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ सोपवण्यात आलेले होते. मात्र या दोन्ही मतदार संघाबाबत त्यांना स्वतंत्र निर्णय घेता येत नव्हता त्यामुळे व जातीपातीच्या राजकारणाला कंटाळून रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी त्यांनी उभाठा गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून सोमवारी वालूर येथे वंचित बहुजन आघाडीचे जिंतूर सेलू मतदारसंघाचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत वालूर येथे सकाळी 11 वाजता ते वंचित मध्ये प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एक तडका फडकी निर्णय घेऊन त्यांनी राजकारणात मोठा निर्णय घेऊन शिवसेनेला भगदाड पाडले आहे याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR