Homeनांदेडसोनू कल्याणकर खून प्रकरणाला वेगळे वळण

सोनू कल्याणकर खून प्रकरणाला वेगळे वळण

भाजप नगरसेवकाच्या चौकशीची थेट आयजींकडे मागणी

नांदेड : प्रतिनिधी
शहरात घडलेल्या सोनू कल्याणकर खून प्रकरणातील आरोपी गजाआड असले तरी आता यास वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात भाजपा नगरसेवक व त्याच्या भावाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांनी थेट आयजी तथा पोलीस उपमहानिरीक्षकांकडे केली आहे.

शहरातील श्रीनगर भागात असलेल्या बीके हॉल परिसरात शिवसेनेचा पदाधिकारी सोनू कल्याणकर यांचा सकाळच्या वेळी रस्त्यावरच खून करण्यात आला होता. त्यात ४ ते ५ आरोपी अटक करण्यात आले आहेत. यात जेलमधील आरोपी मंगनाळे याच्या आई वडिलांचा समावेश असून त्यांची रवानगी पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी मध्ये करण्यात आली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांनी उपमहानिरीक्षक कार्यालयात एक निवेदन दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR