बद्रीनाथजवळ ६ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथवरून जोशीमठकडे जाणारे एक हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याची घटना शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी घडली आहे. या हेलिकॉप्टरमधून सहा जण प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.

या घटनेबाबत जिल्हा प्रशासनाने सांगितले की, त्यांना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, हे हेलिकॉप्टर नक्की कोसळलं आहे का? याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच हेलिकॉप्टरमध्ये नेमकं कोण होतं आणि ही घटना कशी घडली? याबद्दलची सविस्तर माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, जोशीमठ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मनोहर कन्याल यांच्या माहितीनुसार, दुपारी २:२१ वाजता जोशीमठच्या एसडीएमकडून अशी माहिती मिळाली की जोशीमठ परिसरातील चाई गावाच्या परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले (क्रॅश लँडिंग झालं). याबाबत पुढील माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या संदर्भात उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनी सांगितलं की, ट्रान्स भारत कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचे लोकेशन चाई गावाच्या भागात लष्करी तळाजवळ दिसून येत आहे. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथवरून सहस्त्रधाराच्या दिशेने जात होते. दरम्यान, या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक वैमानिक असे एकूण सहा जण होते. मात्र, हेलिकॉप्टर नक्की कोसळलं आहे की आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे? याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ही घटना घडल्यानंतर जोशीमठ आणि पांडुकेश्वर येथील एसडीआरएफची पथके संबंधित ठिकाणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत असे वृत्तात म्हटले आहे.

हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना दुर्दैवी : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले की जोशीमठजवळील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बचाव कार्य सुरू आहे. मी स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी तातडीने हवाई मार्गे हलवण्याचे निर्देश दिले आहेत. मी देवाकडे सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news