हिंदू विधवेचा शेतजमिनीतील अधिकार पूर्ण मालकीचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंदू वारसाहक्क कायदा, १९५६ च्या कलम १४(१) अन्वये, शेतजमिनीमधील हिंदू विधवेचा मर्यादित अधिकार हा पूर्ण मालकी हक्कामध्ये रूपांतरित होऊ शकतो; तसेच, महिला वारसदाराच्या निधनानंतर तिच्या संपत्तीची वारसाहक्क निश्चिती करताना तिच्या मृत्यूप्रसंगी लागू असलेल्या वैयक्तिक कायद्याचा विचार करावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने एका हिंदू महिलेच्या दुस-या विवाहातून जन्मलेल्या दोन मुलांच्या वारसाहक्कांवर शिक्कामोर्तब केले आहे.

खाजानो याचा पहिला पती मोजू राम आणि त्यांचे मूल राम चंद्र यांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळाला होता. त्याकाळच्या कायद्यानुसार तिला या मालमत्तेत केवळ मर्यादित अधिकार प्राप्त झाला होता. मोजू यांच्या निधनानंतर तिने बाल किशन यांच्याशी दुसरा विवाह केला. या दांपत्याला चंद राम आणि चंदर भान ही दोन मुले झाली. दिल्ली भूमी सुधारणा कायदा, १९५४ नुसार (महिलेचा संदर्भ) भूमिधर म्हणून मान्यता मिळाली होती. खाजानो यांचे १९७३ मध्ये निधन झाले. दुस-या विवाहातील दोन मुलांनी सुमारे १८ एकर शेतजमीन फेरफार रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्यासाठी अर्ज केला.

संपत्ती मर्यादित मालकीऐवजी पूर्ण मालकी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती भट्टी यांनी स्पष्ट केले की, हिंदू वारसाहक्क कायदा, १९५६ च्या कलम १४(१) नुसार हिंदू महिलेच्या ताब्यात असलेली आणि तिची कायदेशीर ओळख असलेली संपत्ती मर्यादित मालकीऐवजी पूर्ण मालकीची ठरते.

मर्यादित हक्क हा पूर्ण मालकी हक्कात बदलला

१९५४ च्या कायद्यानुसार जेव्हा खजानो यांना भूमिधर म्हणून मान्यता मिळाली किंवा त्यांनी जेव्हा हक्क संपादन केला, त्यावेळच्या कायद्यानुसारच त्यांचे अधिकार ठरवले जावेत, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. १९७३ मध्ये त्यांच्या निधनापूर्वी, म्हणजेच १९५६ मध्ये कायदा लागू झाल्यानंतर त्यांचा मर्यादित हक्क हा पूर्ण मालकी हक्कात बदलला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्­या निरीक्षणात नमूद केले की, १९५६ चा कायदा लागू झाल्यानंतर खजानो केवळ मालकच राहिल्या नाहीत, तर वैयक्तिक कायद्याच्या सर्वसाधारण तरतुदींनुसार त्यांचा मर्यादित हक्क पूर्ण अधिकारात रूपांतरित झाला. त्यामुळे दिल्ली भूमी सुधारणा कायद्याच्या कलम ५० ऐवजी कलम ५३ लागू होईल.

न्यायालयाने स्पष्ट केले दोन महत्त्वाचे निकष

अपील फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, वारसाहक्क ठरवताना महिलेच्या मृत्यूची वेळ आणि तिच्या मृत्यूप्रसंगी लागू असणारा वैयक्तिक कायदा हे दोन महत्त्वाचे निकष ठरतात. खजानो यांचे निधन १९७३ मध्ये (१९५६ चा कायदा लागू झाल्यानंतर) झाल्यामुळे त्यांच्या पूर्ण मालकी हक्कामुळे संबंधित कायद्याचे नियम लागू होतात. या कायदेशीर स्पष्टीकरणासह न्यायालयाने अपील फेटाळून लावले.”

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news