25.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’बाहेर घातपाताबाबतच्या ‘त्या’ फोनला प्रेमकहाणीचे वळण

‘मातोश्री’बाहेर घातपाताबाबतच्या ‘त्या’ फोनला प्रेमकहाणीचे वळण

मुंबई : तारीख होती १५ जानेवारी.. सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली. ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर घातपात होण्याची शक्यता.. त्यानंतर पोलिसही अलर्ट झाले. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे.

या फोनला आता लव्हस्टोरीचा अँगल समोर आला आहे. ‘मातोश्री’बाहेर घातपात होणार असल्याचा निनावी कॉल लव्ह ट्रँगलमधून आल्याचे समोर आले आहे. जो नंबर अज्ञात आरोपीने पोलिसांना दिला होता, त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे.

गुजरात ते मुंबई ट्रेनमधून चार ते पाच तरुणांचा ग्रुप मुंबईला येत असून ते ‘मातोश्री’वर घातपात घडवणार आहेत, असा कॉल महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. या कॉल करणा-या व्यक्तीने एक फोन नंबर पोलिसांना दिला होता. पोलिसांनी त्या नंबरधारकाची चौकशी केली. चौकशीत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ज्या व्यक्तीचा नंबर दिला होता त्याच्या प्रेयसीने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात हा कॉल केल्याचं समोर आलं आहे. आता पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR