26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeराष्ट्रीयअभिनेता विजयच्या रॅलीत एक व्यक्ती बंदूक घेऊन पोहोचला

अभिनेता विजयच्या रॅलीत एक व्यक्ती बंदूक घेऊन पोहोचला

बॅरिकेड ओलांडून घुसल्या महिला

पुद्दुचेरी : तमिलगा वेत्री कझगम प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी मंगळवारी पुद्दुचेरी येथील उप्पलमच्या एक्सपो ग्राउंड (न्यू पोर्ट) येथे भव्य रॅली काढली. यावेळी तामिळनाडूतील एका व्यक्तीने बंदूक घेऊन आत घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

त्या व्यक्तीने दावा केला की, त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे. त्याने सांगितले की, तो एक खासगी सुरक्षा अधिकारी आहे, परंतु वेळेवर पोहोचू न शकल्याने तो आपल्या टीमसोबत जाऊ शकला नाही. जेव्हा पत्रकारांनी त्याला विचारले की, तो कोणाला सुरक्षा देत आहे, तेव्हा त्या व्यक्तीने कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे, अभिनेता विजयच्या रॅलीत गर्दी अनियंत्रित झाली. रॅलीमध्ये केवळ ५,००० लोकांना प्रवेश करण्याची परवानगी होती. परंतु, मोठ्या संख्येने लोक रॅलीस्थळी पोहोचले. तरुण-तरुणी आणि महिला बॅरिकेड्स ओलांडून आत घुसल्या. विजयची एक झलक पाहण्यासाठी लोक जवळच्या झाडांवरही चढले.

गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचा-यांना खूप प्रयत्न करावे लागले. २७ सप्टेंबर रोजी करूरमध्ये रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ लोकांचा मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीनंतर विजयची ही पहिलीच जाहीर सभा होती. तामिळनाडू सरकारने विजयला रॅली काढण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR