चौथी पास माणूस मागण्या करतो आणि सरकार जीआर काढते

जालना : एका चौथी नापास माणसाने उपोषणाचे नाटक करत बेकायदेशीर मागण्या केल्या आणि सरकारने त्याच्या दबावाखाली येत ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणले आहे. सरकार चौथी पास माणसाच्या मागण्यांवर लगेच जीआर काढते, हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे अशा अत्यंत कडक शब्दांत लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले की गेल्या दोन-तीन वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. आम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध करायला तयार आहोत. शासनाने नुकतेच सुरू केलेले प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. आम्हाला फक्त मुख्यमंर्त्यांची भेट नकोय, तर मराठा आणि ओबीसी उपसमितीच्या मंर्त्यांच्या उपस्थितीत आमचे आरक्षण कसे संपले, हे आम्ही त्यांना समजावून सांगू. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनीही यावेळी उपस्थित राहावे, अशी मागणी त्यांनी केली.

जरांगे यांच्याकडून मंत्र्यांना आणि नेत्यांना दिल्या जाणा-या शिव्यांवरून हाकेंनी तीव्र संताप व्यक्त केला. जो माणूस लोकशाही मानत नाही, शिष्टमंडळाचा आदर करत नाही आणि मुख्यमंत्र्यांचाही मान ठेवत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? जरांगे शिवीगाळ करत असताना, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या मोठ्या नेत्यांच्या घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणली जात असताना, हे सरकार मूग गिळून का गप्प बसले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला, पोलिसांवर हल्ले झाले आणि ओबीसींची घरे जाळण्यात आली. त्यावेळच्या एसआयटी चौकशीचे काय झाले? या आंदोलनाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी हाके यांनी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news