28 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांच्यासोबतही एक मंथरा, देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

उद्धव ठाकरे यांच्यासोबतही एक मंथरा, देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ज्यांनी कोठारी बंधूंना शहीद केलं, त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारलं, त्यांच्या मांडिला मांडी लावून बसले आहेत. पण त्यांची चूक नाही. रामायणात मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबतही एक मंथरा आहे. तिकडे राजा दशरथ तरी होते. ते पुण्यवान राजे होते. इथे तुम्ही मंथरा सोबत ठेवली, काय तुमचं होईल?, असा हल्लाच देवेंद्र फडणवीस यांनी चढवला.

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने ठाणे महापालिका मैदानात राम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारसेवकांना संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांच्या वजनाने मशीद पडली असेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ठाकरे यांच्या या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले, फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. त्यांना सांगतो अरे जिसके साथ रामजी है, बाबरी मशीद तो छोटी ह,ै हिमालय पर्वत हिलाने की ताकद राम का सेवक रखता है. रामाच्या सेवकात ताकद आहे, तो हिमालय हलवू शकतो. या राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये. आमच्या नसानसात हिंदुत्व आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात हिंदुत्व आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR