24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeराष्ट्रीयअधिका-याच्या घरात सापडला नोटांचा डोंगर

अधिका-याच्या घरात सापडला नोटांचा डोंगर

३० हजारांची लाच, रंगेहात पकडले नोटा मोजून मोजून मशीनही थकल्या

कटक : भ्रष्ट सरकारी अधिका-यांकडे बेहिशोबी मालमत्ता, दागदागिने सापडणं आता आपल्यासाठी नवं राहिलेलं नाही. यादरम्यान, ओदिशामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिका-याला लाचखोरीच्या एका प्रकरणात रंगेहात पकडलं आहे. तसेच या अधिका-याच्या फ्लॅटमधून चार कोटींपेक्षा अधिक रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. अशा कारवाईत झालेली ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रोख रकमेची जप्ती आहे, असेही दक्षता विभागाने सांगितले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कटक सर्कलमधीली खाणींचे उप संचालक म्हणून तैनात असलेले देवव्रत मोहंती यांना ओदिशा दक्षता विभागाने आधी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर एक परवानाधारी कोळसा व्यापा-याकडून त्याच्याकडील कोळसा डेपो व्यवस्थित चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. ही कारवाई करण्यासाठी मंगळवारी दक्षता विभागाने सापळा रचला आणि मोहंती याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.

४ कोटींहून अधिक रक्कम
मोहंती याला अटक करण्यात आल्यानंतर सतर्कता अधिका-यांनी तीन ठिकाणी एकत्रितरीत्या धाड टाकली. त्यात मोहंती याचा भुवनेश्वर येथील फ्लॅट, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घर आणि कटक येथील कार्यालयातील दालन याचा समावेश होता. या धाडीदरम्यान, भुवनेश्वर येथील पाटियामधील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमधून ४ कोटी रुपयांहून अधिकची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

रकमेची मोजणी सुरूच
ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या रकमेची मोजणी सुरू असून मोजणी पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेल्या रकमेचा अचूक आकडा कळणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम ही राज्याच्या सतर्कता विभागाने कारवाईत आतापर्यंत जप्त केलेली सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या कारवाईदरम्यान, मोहंती यांच्या आणखीही काही संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यात भुवनेश्वरमधील पहला परिसरात असलेले दुमजली घर आणि सुमारे १३० ग्रॅम सोन्याचाही समावेश आहे. तसेच इतर शोधमोहीम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR