देशातील ९ राज्यांत ४२ हजार वृद्धांचे नेटवर्क तयार

सुपौल : बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील ७५ वर्षीय मोहन मंडल गावात वृद्धांच्या एका गटाचा भाग आहेत. यात समवयस्क सहकारी एकमेकांची काळजी घेतात व सरकारी योजनांशी जोडण्यासाठी मदत करतात. मोहन यांनाही एका सहका-याने ‘वय वंदना कार्ड’ बनवण्यासाठी प्रेरित केले. त्यावेळी त्यांना हे कार्ड कधीतरी आपला जीव वाचवेल, अशी कल्पनाही नव्हती. काही दिवसांनंतरच मोहन यांना ब्रेन स्ट्रोक आला.

उपचाराचा खर्च लाखो रुपये होता. मग गावच्या ग्रुपने कुटुंबाला योजनेत समाविष्ट रुग्णालयापर्यंत पोहोचवले. तिथे त्यांची शस्त्रक्रिया झाली. तीन लाख खर्च झाले. आज मोहन निरोगी आहेत. आता इतर वृद्धांनाही गरजेच्या खर्चासाठी तयार राहण्यास प्रेरित करतात. यूएन पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मानित हेल्पएज इंडियाने त्सुनामीनंतर अशा गटांचा पाया रचला होता. आज मोहन यांच्यासारखे ४२ हजार वृद्ध देशभरातील ९ राज्यांतील ३ हजार ग्रुप्सशी जोडले गेले आहेत.

एकमेकांच्या मदतीचे व्यासपीठ
वर्ष २००४ मधील त्सुनामीने प्रभावित वृद्धांसाठी २००५ मध्ये चेन्नईत पहिला एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप बनला. त्यानंतर देशभरात सुरू करण्यात आला. एका ग्रुपमध्ये ५५ वर्षे किंवा अधिक वयाचे १०-२० वृद्ध असतात. संस्था गावांमध्ये जाऊन अशा लोकांची ओळख पटवते. ते आर्थिक, सामाजिक किंवा आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करतात. सदस्य नियमित बैठक घेतात.बचत करतात. एकमेकांना कर्ज देतात आणि स्थानिक समस्यांवर एकत्र मिळून काम करतात. या ग्रुप्सचे ७०% वृद्ध पूर्णपणे स्वावलंबी झाले आहेत.

लखपती वृध्द
गटातील प्रत्येक वृद्धाकडे १.१९ लाख रु. जमा झाले. सुपौलमध्ये वृद्ध दरमहा प्रत्येकी ५० रुपये जमा करतात. १५ वर्षांत गटाने आपल्या सदस्यांना २.३३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यातून १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाटा १.१९ लाख रुपये आहे. लोक त्यांना लखपती वृद्ध म्हणतात. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयानेही एल्डर सेल्फ हेल्प ग्रुप मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात समाविष्ट केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news