27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रनवजात बाळाला इमारतीमधून फेकले!

नवजात बाळाला इमारतीमधून फेकले!

अंबरनाथमधील संतापजनक घटना

अंबरनाथ : प्रतिनिधी
एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज २ मधील डी विंगमध्ये ही घटना घडली. या इमारतीत एक महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती. रात्रीच्या सुमारास तिने घरातच स्त्री अर्भकाला जन्म दिला आणि त्यानंतर इमारतीमधून तिला फेकून दिले. सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली.

यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केले. अंबरनाथ शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवला. तर या बाळाची आई आणि आजी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानेच त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR