नवी दिल्ली : मद्यपान केल्यावर माणूस जनावर बनतो, असे निरीक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. हृदयरोग तज्ज्ञ असणा-या डॉक्टर पित्याने ७ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी झालेली शिक्षा माफ होण्यासाठी नराधम पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, हा विकृत माणूस असून, त्याला शिक्षा निलंबित करण्याची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करीत सुप्रीम कोर्टाने स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पित्याला जामीन देणार नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. अति दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती भुरट्या र्चोया करते, असा आमचा अनुभव आहे. अशी व्यक्ती घरात वा पालकांबरोबर फार काळ राहात नाही. जेव्हा तिला दारू प्यावीशी वाटते आणि त्यासाठी खिशात पैसा नसतो तेव्हा ती भुरट्या चो-यांचा मार्ग अवलंबते.
मोठे गुन्हे करणारे गुन्हा करण्यापूर्वी एकत्र बसून दारू प्यायल्याचेही अनेक अनुभव आहे. किंबहुना दारूच्या नशेतच त्यांच्याकडून गुन्हे होऊ शकतात, यावर संबंधित गुन्हेगारांचाही विश्वास असतो. दुसरा दारू पितो म्हणून आपण पितो असे म्हणणारेही अनेक रुग्ण आहेत. ब-याच घटस्फोटांचे मुख्य कारण व्यसन हेच असते. व्यसनांमुळे दुष्परिणामच अधिक आहेत. त्यामुळे तरुणांनी त्याकडे आकृष्ट होण्यापेक्षा विधायक कामाकडे लक्ष द्यावे.
मुलगी पित्यावर आरोप कशाला करेल?
स्वत:च्या वडिलांविरुद्ध मुलगी साक्ष का देईल?. मुलगी लहान असूनही तिला उलटतपासणीला सामोरे जावे लागले आहे. मद्य पिल्यावर माणूस जनावर बनतो. खरे तर आम्ही हे विधान करायला नको, खंडपीठ म्हणाले.
आरोपीस दिलासा नाही
तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यासाठी पात्र नाहीत. पीडित मुलीने पित्याविरोधात जबाब दिला आहे. तो एक विकृत माणूस आहे. मुलीवर अत्याचार केले तेव्हा तो माणूस नशेत होता, असे तोंडी निरीक्षण नोंदवत न्या. बी. व्ही. नागरत्ना व सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
आरोपीच्या वकिलाने मुलीला साक्ष शिकवण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, खंडपीठाने हे आरोप फेटाळून लावत नराधम पित्याला दिलासा देण्यास नकार दिला.
काय आहे प्रकरण?
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत पतीने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ती वाराणसीत राहत असून, पती हल्द्वानी येथे राहतो, तिथे तो एक नर्सिंग होम चालवतो. अशी माहिती पत्नीने न्यायालयाला दिली आहे. २३ मार्च २०१८ रोजी पती मुलीला ३ घेऊन हल्द्वानीला गेला. मात्र, ३० मार्च रोजी पत्नीला फोन करून मुलीला घेऊन जाण्याचे त्याने सांगितले. नंतर मुलीने तिच्या आईला सांगितले की तिचे वडील वाईट व्यक्ती आहेत आणि त्यांनी तिच्याशी वाईट पद्धतीने वागले, आईने तक्रारीत म्हटले आहे.