गोपालगंज : बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे पोलिसांनी तीन तस्करांकडून एक असा पदार्थ जप्त केला आहे. ज्याच्या ५० ग्रॅमची किंमत तब्बल ८५० कोटी रुपये एवढी आहे. बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी तीन तस्करांकडून एक असा पदार्थ जप्त केला आहे. ज्याच्या ५० ग्रॅमची किंमत तब्बल ८५० कोटी रुपये एवढी आहे. गोपालगंज पोलिसांनी ८५० कोटी रुपये किंमत अससेल्या कॅलिफोर्नियम पदार्थासह तीन तस्करांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या कॅलिफोर्नियमचे वजन केवळ ५० ग्रॅम एवढे आहे.
पोलिसांनी एका गोपनीय माहितीच्या आधारावर तस्करांना पकडण्यासाठी कुचायकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बल्थरी चेकपोस्टवर नाकेबंदी केली होती. यादरम्याान अवघे ५० ग्रॅम वजन असलेला किरणोत्सारी पदार्थ कॅलिफोर्नियम जप्त करून तीन तस्करांना अटक केली. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारामधील किंमत ८५० कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या किरणोत्सारी पदार्थाचा वापर कुठे करायचा होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांचे पथक याचा अधिक तपास करत आहेत. मात्र या मौल्यवान किरणोत्सारी पदार्थाचा वापर हा अणुभट्ट्यांमध्ये अणुऊर्जेची निर्मिती करण्यासाठी होतो, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे.
एसपींनी पुढे सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या किरणोत्सारी पदार्थाची हाताळणी आणि पुढील तपासासाठी एफएसएलच्या विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे. त्याशिवाय अणुऊर्जा विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तस्करांपैकी छोटे लाल प्रसाद हा उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहीराज येथील रहिवासी आहे. तर चंदन कुमार गुप्ता आणि चंदन राम हे गोपालगंजमधील रहिवासी आहेत. या तस्करांजवळ हा पदार्थ कुठून आला आणि ते त्याचा काय वापर करणार होते, याचा शोध घेतला जात आहे.