21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार अशोक पवार यांच्या पुत्राचे अपहरण

आमदार अशोक पवार यांच्या पुत्राचे अपहरण

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातील शिरुरमध्ये आमदार पुत्राचे अपहरण करून त्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून त्याला विवस्त्र करण्यात आले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अ‍ॅड. असीम सरोदेंनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

सरोदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अपहरण झालेल्या ऋषिराज पवारचा व्हिडीओ दाखवला. ऋषिराजने त्याच्यासोबत घडलेला प्रकार व्हीडीओच्या माध्यमातून कथन केला. आमच्यासोबत प्रचारात फिरणा-या भाऊ कोळपे नावाच्या तरुणाने काही जणांनी मीटिंग करायचे असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दोघे माझ्या गाडीत बसलो.

कार मांडवगण वडगाव रोडला नेली. तेथून दुचाकीने जाऊ, असे कोळपेने सांगितले. तेथून दुचाकीवर बसून एका बंगल्यापर्यंत गेलो. तिथे एका रुममध्ये बोलावले. तिथे दार बंद करून मारहाण करीत अंगावरचे कपडे काढले, असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR