Homeक्रीडाअभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम

अभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने बुधवारी आयपीएल स्पर्धेतील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात आणखी एका स्फोटक खेळीसह मैफील लुटली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने फक्त १३ चेंडूत ३५ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याचे अर्धशतक हुकले, पण २६९.२३ च्या स्ट्राइक रेटच्या जोरावर त्याने ख्रिस गेलला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील चौथ्या षटकात लॉकी फर्ग्युसन याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना तो झेल बाद झाला. पण त्याआधी २५ वर्षीय सलामीवीराने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा हा आयपीएलमध्ये सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक वेळा २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. १४ वेळा त्याने ही कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावे होता. २०२१ च्या हंगामात अखेरचा आयपीएल सामना खेळणा-या गेलने १३ वेळा अशी कामगिरी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR