पूर्णा : मागील ४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात पूर्णा पोलिसांना यश आले आहे. पूर्णा पोलिस विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी शेख बाबू उर्फ तालेब शेख मेहबूब याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पूर्णा पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून विविध गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुरनं. ०५/२०२२च्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध पोलिस घेत होते. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३३६, ५०४, ३४ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(२)(व्ही), ३ (१)(आर) आणि ३ (१)(एस) अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे विविध गुन्हे नोंद झाल्यापासून आरोपी शेख बाबू सातत्याने पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
फरार आरोपी शेख बाबू हा पूर्णा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पूर्णा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलिस निरीक्षक बेंद्रे यांनी त्वरित विशेष पथकाची स्थापना केली. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत सतर्कता आणि शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक, वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पीएसआय किरकन, अजय माळकर, भीमराव दुधमल, चंद्रकांत पूदलवाड यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पूर्णा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. आरोपीला ४ वर्षांनंतर अटक करण्यात आल्यामुळे प्रलंबित गुन्ह्याच्या तपासाला आता मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. आकर्षक हेडींग तयार करून द्या.
















