25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रआढळरावांनी अजित पवारांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ

आढळरावांनी अजित पवारांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ

पुणे : ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरू आहे मात्र आढळराव कुठेही दिसून आले नाहीत.
हेच आढळराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा अन् आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वांत आधी आढळराव उपस्थित होते.

लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधतायेत. त्यामुळेच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते.
या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यताही वर्तवली जाते. आज अजित पवार यांच्या हस्ते खेड विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ पार पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR