परभणी : एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शिवाजी नगर शाखेच्या सेमी इंग्रजी विभागाचा विद्यार्थी आदित्य नितीन खळीकर याने शालेय जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमंक पटकावला आहे. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक नितीन बिरादार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
आदित्य याने मिळवलेल्या यशाबद्दल नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर, सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंत पांडे, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक शिवाजीराव आरळकर, सुर्यकांत पाटील, सुनील रामपुरकर, श्रीपाद कुलकर्णी, विश्वास दिवाळकर, गणेश सुर्यवंशी, डॉ. सुनील तुरुकमाने, क्रीडा शिक्षक नितीन बिरादार, अमोल गोरकट्टे, अभिजित कुलकर्णी, कोच संदीप लटपटे यांनी अभिनंदन केले आहे.