23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रआघाडीचे जागावाटप झाल्यानंतर वंचित आपला निर्णय घेणार!

आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर वंचित आपला निर्णय घेणार!

मुंबई : (प्रतिनिधी) महाविकास आघाडीतील तीन्ही घटक पक्षांमधील जागावाटपाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तीन्ही पक्षांतील जागावाटपात शिवसेनेला किती जागा मिळणार, कोणत्या मिळणार याची स्पष्टता आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा करेल असे स्पष्टीकरण वंचितने केले आहे.

आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून ती लवकरच पूर्ण होईल. तसेच वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष आहे, या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वंचितने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचितला अद्याप महाविकास आघाडी किंवा इंडियामध्ये अद्यापही आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र शिवसेना पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाचा घटक पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे आपापसात जागावाटप होत नाही तोवर आम्हाला शिवसेनेबरोबर जागा वाटप करता येणार नाही. त्यामुळे तीन्ही पक्षांनी आपापसात जागावाटप केल्यास वंचित आणि शिवसेनेचा आपापसात जागावाटपाचा मार्ग मोकळा होईल असे वंचितचे मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR