26.3 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeमहाराष्ट्रपक्षी धडकल्याने एअर इंडियाच्या विमानाची पुणे विमानतळावर लँडिंग

पक्षी धडकल्याने एअर इंडियाच्या विमानाची पुणे विमानतळावर लँडिंग

परतीचे उड्डाण रद्द

पुणे : दिल्लीवरून पुण्याला आलेल्या एका एअर इंडियाच्याविमानाला पक्षाची धडक बसली. विमान धावपट्टीवरून उतरल्यानंतर ही बाब समोर आली. शुक्रवारी सकाळी ७ वाजता विमान विमानतळावर आले. त्यानंतर त्याचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.

एअर इंडियाचे एआय-२४६९ हे विमान दिल्लीवरून पहाटे ५.३१ वाजता निघाले होते. सकाळी ७.१४ वाजता पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर हे विमान सुरक्षितपणे उतरले. विमान पुणे विमानतळावर उतरल्यानंतर कंपनीच्या अधिका-यांनी विमानाला पक्षी धडकल्याची माहिती दिली. एअर बस कपंनीचे ३२० या श्रेणीतील हे विमान आहे. हेच विमान पुण्यावरून पुन्हा दिल्लीला जाणार होते. पण, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.

एअर इंडियाच्या अधिका-यांनी सांगितले की, फ्लाईट एआय-२४७० (एआय-२४६९ दिल्ली-पुणे) हे २० जून रोजी पुण्यावरून दिल्लीला जाणार होते, पण दिल्लीवरून येत असतानाच विमानाला पक्षाची धडक बसल्याचे आढळून आले, त्यामुळे परतीचे उड्डाण रद्द करणयात आले. विमानाला तपासणीसाठी केली जाणार आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्या प्रवाशांना दिल्ली जायचे त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आमचे प्रमुख प्राधान्य असल्याचे एअर इंडियांच्या अधिका-याने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR