पुणे : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पोलिस सर्व सत्य समोर आणतील असे म्हटले. माध्यमांनी या घटनेबद्दल विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘सध्यातरी काहीच बोलणे उचित नाही.
पोलिस त्यांचे काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल. तसेच सर्वांच्या आशिर्वादामुळे आम्ही सुखरुप आहोत असेही त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर क्रॅशचा घटनाक्रमही सांगितला. महाडमध्ये शिवसेनेची(उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारसभा होती. या प्रचारसभेनंतर रात्री पावणे दोन वाजता अनिल नवगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला.