21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरेंविरोधात तक्रार

अमित ठाकरेंविरोधात तक्रार

मुंबई : प्रतिनिधी
मनसेतर्फे दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जातो. या पार्कवर रोषणाई करून सेल्फी पॉइंट्स उभारले जातात. येथे अवघी मुंबापुरी उपस्थित राहते. परंतु आता आचारसंहिता काळातही हा दीपोत्सव साजरा होत असल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने यावर आक्षेप घेतला. त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याच आवाहन केले. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले असून, त्यात राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून ‘दीपोत्सव’ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरिता मनसेतर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. हा पूर्णत: नियमभंग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दीपोत्सवाच्या उद्घाटनाला माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे नियमानुसार उमेदवारी खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा माहिम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणीही ठाकरे गटाने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR