महिला पत्रकारांवरील कथित हल्ल्याची चौकशी होणार

नवी दिल्ली : आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांसोबत कथित मारहाण आणि गैरवर्तन झाल्याच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. तसेच, महिला पत्रकारांना अटक न करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिल्याचे वृत्त आहे. आंदोलनाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांसह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांना दोन स्वतंत्र सीलबंद लिफाफ्यांमध्ये माहिती सादर करण्यास सांगितले. पहिल्या लिफाफ्यात पोलिसांकडून मारहाण किंवा गैरवर्तन झाल्याचा आरोप करणा-या महिला पत्रकारांची नावे देण्यास सांगण्यात आले आहे. तर, दुस-या लिफाफ्यात संभाव्य चौकशी समितीमध्ये समावेश करता येईल अशा निवृत्त महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांची नावे सादर करण्यास सांगितले आहे.

आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची सत्यता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि पोलिस अधिका-यांनी आंदोलनाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल रेकॉर्ड आणि अन्य उपलब्ध सामग्री सुरक्षित ठेवावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, खासगी व्यक्ती आणि संबंधित पक्षांनाही त्यांच्याकडे उपलब्ध असलेले व्हीडीओ तसेच अन्य पुरावे जतन करून ठेवता येणार आहेत. आवश्यकतेनुसार हे पुरावे न्यायालयात सादर करता येतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news