एसटी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार; बँकेच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घ्यावी

मुंबई : प्रतिनिधी

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या एसटी कर्मचा-यांच्या बँकेत कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी सुरू असतानाच, बँकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी संचालक मंडळातील सदस्यांमध्ये परस्पर संघर्ष सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे जणू गुंडागर्दीचा अड्डाच बनल्याची टीकाही त्यांनी केली.

एसटी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, फाईल गहाळ होण्याचे प्रकरण आणि बेकायदेशीर खरेदी यांसंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर या प्रकरणांच्या चौकशीसाठी प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कथित गैरव्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठी बँकेच्या संचालकांमध्ये परस्पर कुरघोडी सुरू असल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे.

बँकेवरील वर्चस्वाच्या संघर्षातून नागपाडा पोलिस ठाण्यात काही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवनातील बँकेच्या मुख्य कार्यालयात चौकशीसाठी पोलिसांच्या फे-या वाढल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी एक व्यक्ती वस्तरा म्हणजेच धारदार शस्त्र घेऊन आल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद नागपाडा पोलिस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. संबंधित व्यक्तीने एका संचालकाने आपल्याकडून लाखो रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याचा दावाही बरगे यांनी केला. या सर्व प्रकारांमुळे बँकेचे कामकाज आणि प्रतिमा धोक्यात येत असून, बँकेला आर्थिक संकटात ढकलण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण
एसटी महामंडळाचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय आणि बँकेचे मुख्य कार्यालय एकाच इमारतीत असल्याने, बँकेतील कथित गैरप्रकार आणि संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान होणा-या वादांचा परिणाम महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचा-यांवर होत असल्याचा दावा बरगे यांनी केला आहे. या घटनांमुळे कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गेल्या दोन वर्षांत बँकेच्या कार्यालयात पोलिस किती वेळा आले, याची माहिती सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या नोंदी तपासून घ्यावी. तसेच, नागपाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींची माहिती घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.

बँकेच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घ्यावी
बँकेचे अध्यक्ष तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी. बँकेच्या कार्यालयामुळे महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचा-यांना त्रास होत असल्याचे आढळल्यास, एसटीच्या मुख्यालयातील बँकेचे कार्यालय हटवून ते अन्यत्र हलविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news