पुणे : पुण्यातील शनिवार वाड्यातील काही दिवसांपूर्वी नमाज पठणाचा व्हीडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या. शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. १७३० मध्ये बाजीराव पेशव्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली. या वाड्याला इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हीडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने या ठिकाणी जाऊन आंदोलन केले. मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्यात आली.
पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केली. त्यानंतर आता ऐतिहासिक शनिवार वाड्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावं, आधार कार्ड चेक करूनच लोकांना आतमध्ये सोडावं अशी मागणी हिंदू महासभेकडून करण्यात आली आहे. गेले काही दिवसांपासून ऐतिहासिक शनिवार वाडा या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं होतं यासंदर्भात वाद सुरू आहे आणि त्या वादात आता हिंदू महासभेने देखील उडी घेतली आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी या दर्ग्याचा विषय आम्हीच घेतला होता. सरकारमधील लोकांनी पोलिसांना आदेश देण्याऐवजी टाइम पास करण्यासाठी ८ दिवसांची वेळ दिली असे म्हणत खासदार मेधा कुलकर्णींवर निशाणा साधला आहे. पण झाले काहीच नाही.
काय केले ८ दिवसांत पोलिसांनी हे आम्ही आज पोलिसांना विचारू. शनिवार वाड्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा असे पत्र आम्ही देणार आहोत आणि हिंदूंच्या भावना जाग्या आहेत, हे दाखवण्यासाठी सामुदायिक वंदे मातरम सुद्धा म्हणणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
















