19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeक्रीडाअमन सहरावतचा उपांत्य फेरीत पराभव

अमन सहरावतचा उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकचा १२ दिवस निराशाजनक ठरला होता. मात्र, गुरुवारी भारताचा कुस्तीपटू अमन सहरावत याने ५७ किलो फ्री स्टाईल प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, उपांत्य फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला. त्याला जपानच्या अव्वल मानांकित हिगुची रे याने तांत्रिक श्रेष्ठतेवर पराभूत केले.

पहिल्या फेरीत म्हणजे तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत जपानी कुस्तीपटूने अमनचा पराभव केला आणि १० गुण मिळवले आणि त्याने तांत्रिक श्रेष्ठतेवर विजय मिळवला. आता हिगुचीने अंतिम फेरी गाठली आहे. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सहरावतने ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरी गाठल्याने आणखी एक पदकाच्या आशा होत्या. परंतु त्याने भारतीयांची निराशा केली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून अमन सहरावत हा एकमेव पैलवान पात्र ठरला होता. उपांत्यपूर्व फेरीत अबाकारोवला सहजपणे पराभूत केले. अमन सहरावतने पात्रता फेरीत मैसेडोनियाच्या व्लादिमीर इगोरोव याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. परंतु उपांत्य फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पुरुष कुस्तीतील पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR