तेहरान : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. इराण याला जबाबदार आहे. इराणने पुन्हा एकदा यूएईवर मोठा हल्ला केला आहे. रिपोर्ट्नुसार इराणने संयुक्त अरब अमीरात म्हणजे यूएईवर अनेक मिसाइल, क्रूज मिसाइल आणि ड्रोन्स डागले. यूएईची एअर डिफेन्स सिस्टिम सक्रीय झाली आहे. इराणकडून येणा-या मिसाइल्स हवेतच इंटरसेप्ट करुन संपवले जात आहे. यूएईच्या नॅशनल इमर्जन्सी क्राइसिस अँड डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.
जनतेला फक्त सरकार अपडेट्सवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराणने काल रात्रीच परस्परांवर मिसाइल डागले. त्यानंतर इराणकडून यूएईला टार्गेट करण्यात आले. याआधी सोमवारी इराणने यूएईवर १५ मिसाइल्स आणि ४ ड्रोन्सनी हल्ला केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी यूएईवरील या हल्ल्याचा निषेध केला होता. अमेरिका आणि इराणमध्ये ८ एप्रिलला सीजफायरची घोषणा झाली होती. ३० दिवसांच्या शांततेनंतर मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
त्याचा रेकॉर्ड तयार करेल
यूएईने इराणकडून आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात जितकं नुकसान झालं, त्याचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक कमिटी बनवली आहे. ही समिती इराणच्या हल्ल्यात आतापर्यंत किती नुकसान झालं, त्याचा रेकॉर्ड तयार करेल. त्यानंतर याच पुराव्यांच्या आधारावर यूएई कायदेशीर लढाई लढून न्याय मागणार आहे.
परदेशी एक्सपर्ट्सची मदत घेतली जाईल
या कमिटीचे नेतृत्व यूएईचे अटॉर्नी जनरल करतील. यात वेगवेगळी मंत्रालये आणि सरकारी एजन्सीचे अधिकारी त्यात सहभागी होतील. गरज पडल्यास परदेशी एक्सपर्ट्सची मदत घेतली जाईल. कमिटी फोटो, टेक्निकल रिपोर्ट आणि दुसरे पुरावे गोळा करेल.
२००० पेक्षा जास्त ड्रोन्स डागले
यूएईनुसार, इराणने आतापर्यंत २००० पेक्षा जास्त ड्रोन्स, शेकडो बॅलेस्टिक मिसाइल्स आणि क्रूज मिसाइल्स डागली आहेत. इराणचे बहुतांश हल्ले एअर डिफेन्स सिस्टिमने परतवून लावले आहेत. पण तरीही आतापर्यंत इराणी हल्ल्यात १३ लोकांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी तेल आणि ऊर्जा ठिकाणांसह महत्वाच्या इमारतींचे नुकसान झाले आहे.
















