पार्थ व जय पवारांमध्ये वाद निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितले होते. काल हे सगळे नेते अमित शाह यांना भेटायला गेले होते. सुनेत्रावहिनी व पार्थ पवार यांना एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. आधी काका-पुतण्यामध्ये दरी निर्माण केली. आता पार्थ व जय पवार यांच्यात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आ.रोहित पवार यांनी आज केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवार गटात पडलेल्या दुफळीवरून गंभीर आरोप केले. पार्थ पवार आणि सुनेत्रा काकींना एकटे पाडले जात आहे. सर्व नेते जे काल अमित शाह यांना भेटायला गेले होते, त्या सगळ्यांना पवार साहेबांनी संधी दिली होती. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे मोठे नेते सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला हे दादांनी मला स्वत: सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी जय पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. काका पुतण्यामध्ये भाजपने वाद लावला आहे. आता तसच दोन भावांमध्ये देखील भाजप वाद लावत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

पार्थ आणि नेत्यांमध्ये संवाद नसल्यामुळे पार्थ आणि सुनेत्रा काकींचा कंट्रोल कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका नेत्याला अर्थ खात हवे आहे, पुर्वी केंद्रात मंत्री राहिलेल्या एकाला परत मंत्री व्हायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणा-या लोकांनी काल अमित शाहांकडे स्व. अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली असती तर बरं वाटले असते. मी पार्थ पवार आणि जय पवार आणि सुनेत्रा काकी यांनी भाजप आणि तुमच्या जवळच्या नेत्यांची खेळी समजून घेतली पाहिजे. अजितदादांचा पक्ष दादा होते म्हणून सत्तेत आला. दादा गेल्यावर पार्थला पद मिळालं पण जवळच्या लोकांपासून काळजी घेतली पाहिजे असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.

भाजपाला सोडून परत येणार असतील तर स्वागतच
विलीनीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ते नेते भाजप सोडून आमच्याकडे येत असतील तर आमचा विरोध असायचे कारण नाही. पवारांनी कायम भाजपच्या धोरणाला विरोध केला आहे. त्यात सुप्रियाताईंनी विरोध केला. त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर नाही. पण जर ते भाजपचा विरोध करणार असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊ.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news