पूर्णा : शहरातील तहसील कार्यालयाच्या ईमारतीचा दरवाजा अज्ञात आंदोलन कर्त्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार, दि.१ नोव्हेंबर रोजी घडली. यावेळी अज्ञातानी मुख्य प्रवेशद्वारावर पेट्रोल टाकून आग लावली. यावेळी कर्मचारी व पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळता पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी शहरात तातडीने भेट देवून घटनेची माहिती घेतली. दरम्यान तहसील कार्यालय परीसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. यावेळी ड्युटीवरील कर्मचारी व पोलीस कर्मचा-यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली. घटनेची माहिती मिळताच पूर्णा शहरात पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. दाखल झाल्या असून त्यांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली.
यानंतर डी वाय एसपी गावडे, पो.नि.प्रदिप काकडे, सपोनि नरसिंह पोमनाळकर आदिनी घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून तहसील कार्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.