पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल(गुरूवारी, ता १५) रोजी मतदान पार पडले, त्याचा निकाल शुक्रवार १६ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे, अनेक कारणांनी महानगरपालिका निवडणूक चर्चेत आली, त्यातीलच एक कारण म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती.
प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या दोघींचा निकाल आता समोर आला आहे. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती, मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे. या प्रभागात एक जागा अजित पवारांच्या पक्षाला मिळाली आहे, तर बाकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत.
रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव
सोनाली आंदेकर प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाली आहे. रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. सोनाली आंदेकरने तुरुंगातुन निवडणूक लढवली होती. हत्या झालेल्या वनराज आंदेकरची ती पत्नी आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणी ती देखील आरोपी आहेत.

