मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चर्चेत आले आहेत. अनिल देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख मला वरळीमधील कॉफी शॉपमध्ये भेटले होते.देशमुखांविरोधतला खटला मागे घेण्याची सारखी विनंती करत होता. माझ्या पाया पडत होता. असा गौप्य स्फोट माजी माजी आयपीएस परमबीर सिंह यांनी केला आहे.
सोमवारी अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाचा संदर्भ दिला. चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर का आणला जात नाही? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावेळी अनिल देशमुख यांनी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक ठेवण्याबाबत सर्वात खळबळजनक आरोप केला. आहे.
दरम्यान, आता या प्रकरणामध्ये माजी माजी आयपीएस परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विषयी अनेक धक्कादायक खुलासे करत म्हणाले, त्या भेटीत सलील माझ्या गयावया करु लागला. मला खटला मागे घेण्याची सारखी विनंती करत होता. माझ्या पाया पडत होता. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. हवे तर अनिल देशमुखसुद्धा तुमची माफी मागतील. तुम्हाला डीजी केले जाईल. परंतु आपण त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळले, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.
माजी आयपीएस अधिकारी परामबीर सिंगहे त्या प्रकरणाचे मास्टर माईंड होते. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.
सर्वांची नार्को टेस्ट करा
परमबीर सिंह पुढे म्हणाले की, मी आरोप केल्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात माझी आणि सलील देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी अनिल देशमुख कारागृहात गेले नव्हते. मी आता जे आरोप करत आहे, त्यातील शब्द न शब्द खरा आहे. त्यासंदर्भात नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. पण अनिल देशमुख, सलिल देशमुख आणि संजय पांडे यांचीही नार्को टेस्ट करावी, असे परमबीर सिंह यांनी सांगितले.